‘डिस्ग्रेस’ : अधःपतनाचे आख्यान विलास साळुंके २१ जुलै २०२१

दक्षिण आफ्रिकेचे नोबेल पारितोषिक विजेते लेखक जे. एम. कुट्से यांच्या ‘डिस्ग्रेस’ या कादंबरीला १९९९ चे मॅनबुकर हे नामांकित पारितोेषिक मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट आणि ती संपल्यानंतरची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती यावर प्रकाश टाकणारे कथात्म साहित्य कुट्से यांनी लिहिले. त्याबद्दल एका समीक्षकाने म्हटले आहे की, कुट्से स्वत:बद्दल खोटे बोलत नाहीत आणि मानवाच्या आजच्या स्थितीब…